गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बीड (BEED NEWS) जिल्ह्यातील आश्चर्यचकित करणारी अनेक प्रकरण समोर येत आहेत.
अशातच बीड (BEED NEWS)मधील खरात आडगाव या गावात गावगुंडांनी तुफान दहशत माजवली असून या सगळ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गावगुंडांनी शेतात डुक्कर आणि शेळ्या सोडल्याचा आरोप बीडमधील संतप्त गावकऱ्यांचा आक्रोश
मिळालेल्या माहितीनुसार बीड मधील माजलगावच्या खरात आडगाव या गावात गावगुंडांनी अनेक शेळ्या आणि डुक्कर पाळले आहेत. शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या पिकात या शेळ्या आणि डुक्कर हैदोस घालत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. हा प्रकार अनेक वर्षांपासून घडत असला तरीही गावगुंडांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत मुकाट्याने हे सगळं सहन केलं. मात्र अखेर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय केला. सर्व गावकऱ्यांनी या गावगुंडांकडे मोकाट डुक्कर आणि शेळयांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. परंतू ‘तुमची मला हे सांगायची हिम्मत कशी झाली ?’, असं म्हणत गावगुंडांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे काही व्हिडिओ देखील समोर आले असून ज्या मध्ये अनेक शेतकरी हे गंभीर जखमी झालेले दिसत आहेत. मात्र या सगळ्या नंतरही पोलिसांनी या प्रकरणाची अपेक्षित दखल न घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर पीडित गावकऱ्यांनी या मोकाट सोडलेल्या डुकरांचा आणि शेळ्यांचा बंदोबस्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर केलाय.
Modi Cabinet Minister Portfolios : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर
PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने
MOHAN BHAGWAT| संघघोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल
Guardian Ministerचा वाद मिटला? 1मे रोजी रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला महाजन झेंडावंदन करणार
हा तर मृतांच्या नातवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – देवेंद्र फडणवीस