Beed News

Beed News : बीड हादरलं ! डोक्यात दगड घालून शाळेतील शिपायाची निर्घृणपणे हत्या

738 0

बीड : सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. बीडमधून (Beed News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये शाळेतील एका शिपायाची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना बीडच्या (Beed News) माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये घडली आहे. अनिल सर्जेराव शेंडगे (वय 27 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Delhi News : ट्रेडमिलवर धावताना शॉक लागून इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

काय घडले नेमके?
अनिल सर्जेराव शेंडगे हे मूळचे धारूर तालुक्यातील चिखली येथील रहिवाशी होते. ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धारूर येथील शाळेतील शिपाई पदावर कार्यरत होते. माजलगाव येथील मंजरथ रोड शिक्षक कॉलनी या ठिकाणी ते राहत होते. गुरुवारी त्यांना मोबाईलवर कॉल करून बायपास रोड याठिकाणी बोलावण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar : वर्गात बाकावर बसण्यावरून झालेल्या वादातून कार्तिकची हत्या; छत्रपती संभाजीनगर हादरलं

या ठिकाणी (Beed News) आल्यानंतर त्यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. रात्री 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!