आपल्या मुलीला त्रास देतो असा आरोप करत मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुण्यातील शिवणे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
*नेमकं काय आहे प्रकरण ?*
शिवणे येथील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सी मधील वंदना नावाच्या महिलेने मुलीला त्रास देतो म्हणून एका तरुणाला मारहाण केली आहे.
कोथरूड येथील प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय वर्ष 22) या युवकाला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. बुधवारी संध्याकाळी घरी मुलीला भेटायला आलेल्या प्रद्युम्नला मुलीच्या आईने घरात का आला? यावरून जाब विचारला असता झालेल्या वादावादीमध्ये वंदना यांनी प्रद्युम्न याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून जखमी केले.