भटक्या विमुक्त जमाती पुनर्वसनातील जमीन घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा – लक्ष्मण माने

619 0

वारजे माळवाडी येथील जागा भटक्या-विमुक्तांच्या आदर्श वसाहतीसाठी राज्य शासनाने राखीव ठेवली आहे. मात्र यातील काही जागा संस्थेचे चेअरमन आबादास गोटे व सेक्रेटरी या दोघांनी संगनमत करून बिल्डरला विकली. आता त्या जागेवर टोळेजंग इमारत उभी आहे. या प्रकरणी गोटेंवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु बिल्डरवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शासनाने संबंधीत बिल्डरवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी उपराकार लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

लक्ष्मण माने म्हणाले, सर्वे क्रमांक 35/ 2 क्षेत्र हेक्‍टर 86 आर सर्वे क्रमांक 36 /2 क्षेत्र 9 हेक्टर 35 आर या जागा भटक्या-विमुक्तांच्या आदर्श वसाहतीसाठी राज्य शासनाने सुमारे 35 वर्षापासून राखीव ठेवल्या आहेत. खासदार शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सदर मिळकतीचे भटक्या-विमुक्तांच्या आदर्श वसाहतीसाठी राखून ठेवल्या होत्या. परंतु यातील सर्वे क्रमांक पस्तीस एकर मधील पाच एकर जागा रामनगर गृहनिर्माण संस्थेला देण्यात आली आहे. सदरची जागा या संस्थेचे चेअरमन आबादास गोटे व सेक्रेटरी या दोघांनी संगणमत करून बिल्डरला विकली.

त्या लोकांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले त्यातील काही मूठभर लोकांना बिल्डरने जागा दिल्या यातील बहुसंख्य लोक वडार समाजातील असून दारिद्र्यरेषेखाली आहेत. या लोकांची घोर फसवणूक झाली असून भटक्या-विमुक्तांच्या नावाने भलत्याच लोकांनी या जागेवर प्रशस्त इमारती बांधल्याचे दिसून येते .गोटे व बिल्डर यांच्यावर गुन्हे दाखल त्यापैकी गोटेवर वर गुन्हा दाखल झाला आहे. आमचे लोक गरीब असल्याने बिल्डरला घाबरत आहे. आता शासनाने समोर येऊन बिल्डरवर गुन्हे दाखल केले पाहिजे. व संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. अशी पुण्यातील पत्रकार परिषदेत मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा भटक्या-विमुक्तांच्या नावाने चालू आहे. भटक्या विमुक्त जमाती संघटना गेली तीस वर्षापासून , लढा लढत आहे. आमचे लोक गरीब असल्यामुळे सातत्याने लढणे परवडत नाही. प्रशासन अत्यंत भ्रष्ट असून प्रशासनाच्या वतीने या शासकीय जागेची वासलात लागत आहे. अशीच परिस्थिती मुंढवा सेटलमेंट येथील जमिनीची आहे.

Share This News

Related Post

राज ठाकरे आजपासून पुण्यात ; महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार राज ठाकरे ?

Posted by - March 7, 2022 0
महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी…

देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉंबचा तपास सीआयडीकडे, गृहमंत्र्यांची माहिती

Posted by - March 24, 2022 0
मुंबई- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. राज्याचे…

जागतिक पर्यावरण दिवस ! इतिहास, महत्व आणि 2022 ची थीम जाणून घ्या

Posted by - June 5, 2022 0
5 जून या दिवशी असणारा दिन म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.…

धक्कादायक : विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराची कारला धडक; त्यानंतर कारचालकाला रस्त्यावरून नेले 1 KM फरपटत; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Posted by - January 17, 2023 0
बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ज्येष्ठ व्यक्तीला दुचाकीने रस्त्यावर फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *