Aurangabad Crime News

Aurangabad Crime News : औरंगाबाद हादरलं ! आईकडून पोटच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न; नशीब बलवत्तर म्हणून…

2913 0

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Crime News) शहरातील फुलेनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Aurangabad Crime News) एका निर्दयी आईने आपल्याच पोटच्या मुलीला झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. जादुटोण्याच्या आहारी गेल्याने या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. जादुटोण्याच्या दावा करणाऱ्या मैत्रिणीने मुलीला जाळल्यास धनलाभ होईल, असे सांगितल्यानंतर आईने हे पाऊल उचलले आहे. पीडित मुलीने जखमी अवस्थेमध्ये घरातून पळ काढत पोलीस ठाणे गाठल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली आहे. पार्वती दादासाहेब हुलमुख (वय 40 वर्षे, रा. गल्ली क्र. फुलेनगर, आंबेडकरनगर) असे आरोपी महिलेच नाव आहे तर सुप्रिया दादासाहेब हुलमुख (वय 20 वर्षे) असे जखमी मुलीचं नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुप्रिया हुलमुखच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असल्याने ती आपल्या आई व भावासह फुलेनगरमध्ये राहते. शिक्षणासोबतच ती एका खासगी कंपनीत कंत्राटी म्हणून काम करते. दरम्यान 17 ऑगस्ट रोजी दिवसभर कंपनीत काम करून ती घरी परतली. घरी आल्यावर जेवण करून सुप्रिया नेहमीप्रमाणे रात्री झोपी गेली. मात्र, पहाटे साडेचार वाजता तिला चटक्यांची जाणीव झाल्याने ती खडबडून जागी झाली. तेव्हा तिचे पांघरुण जळत होते. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिची आईच तिला पेटवण्याचा प्रयत्न करीत होती. तिची आरडाओरड ऐकून भावाने तिच्या दिशेने तत्काळ धाव घेतली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यात ती गंभीर जखमी झाली.

जादुटोण्याच्या आहारी गेल्याने आईकडून हे धक्कादायक कृत्य
मिसारवाडी परिसरात राहणारी शकुंतला काळी जादू सांगत अनेकांना फसवण्याचे प्रकार करते. सुप्रियाची आई तिच्याकडे जाऊन जादूटोणा करायची. दरम्यान, ‘तू जर मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल. तसेच तुझ्या मुलाचे चांगले होईल,’ असे शकुंतला आहेर हिने पार्वतीला सांगितले होते. त्यामुळे जादुटोण्याच्या आहारी गेलेल्या पार्वतीने आपल्याच मुलीला झोपेत असतानाच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तिचे नशीब बलवत्तर म्हणून ती यामधून वाचली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!