पिंपरी-चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड मधील सराईत गुन्हेगारांकडून दोन मॅगझीनसह सात देशी कट्टे, 14 जिवंत काडतुसं आणि एक चारचाकी गाडी असा मुद्देमाल जप्त करून मध्य प्रदेशातून पिंपरी चिंचवड मध्ये हत्यारांची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पाच सराईत गुन्हेगारांसह शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून एकूण 15 लाख 65000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यामध्ये नवल वीरसिंह झामरे, कमलेश उर्फ डॅनी कानडे, सुरज अशोक शिवले, प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे आणि पवन दत्तात्रय शेजवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती मालमत्ता विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.
PCMC Crime: मध्य प्रदेशातून पिंपरी चिंचवडमध्ये हत्यारं तस्करी करणारी टोळी गजाआड