Andhra Pradesh Accident

Andhra Pradesh Accident : बस कॅनॉलमध्ये पडून भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू

2019 0

मुंबई : आंध्रप्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यात (Andhra Pradesh Accident) आज सकाळच्या सुमारास तड़के दर्शी परिसरात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात (Andhra Pradesh Accident)  7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचादेखील समावेश आहे. त्या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. हे सगळेजण पोडिली काकीनाडा या ठिकाणी एका लग्नसमारंभासाठी जात होते. यादरम्यान बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस कॅनॉलमध्ये पलटी झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Bribe News: ब्लॅकडॉग दारूचे 2 खंबे द्या लगेच सही देतो; ग्रामसेवकाची अजब मागणी

या भीषण अपघातात अब्दुल अजीज (65), अब्दुल हानी (60), शेख रमीज (48), मुल्ला नूरजहां (58), मुल्ला जानी बेगम (65), शेख शबीना (35) आणि शेख हिना (6) यांचा मृ्त्यू झाला आहे. लग्नात जाण्यासाठी लोकांनी प्रवासासाठी सरकारी मालकीची आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (APSRTC) बस भाड्याने घेतली होती. बसचालकाला झोप लागल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

Malad Crime News : मालाडमध्ये रिक्षात महिलेचा विनयभंग; 12 तासात आरोपीला अटक

आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
या अपघाताची माहिती समजताच आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर जखमी रुग्णांना तातडीने मदत करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील लोकांनी सुध्दा सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!