संतापलेल्या टेलरनं ग्राहकाच्या पोटात खुपसली कात्री

503 0

टेलर आणि त्याच्या ग्राहकात घडलेल्या एका घटनेनं पुणे हादरुन गेलंय. या घटनेत संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच कात्री खुपसली आहे.

यात ग्राहक जखमी झाली आहे. पुणे शहरातील चंदननगर परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . टेलरिंगच्या दुकानात कपडे अल्टर करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या पोटात कात्री खुपसली असून या घटनेत ग्राहक जखमी झाला आहे.

अजय प्रभाकर पायाळ  असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकाराने चंदननगर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील आनंद पार्क येथील मुज्जमील टेलर शॉप मध्ये घडला आहे.

नेमकं काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुज्जमिल टेलर शॉप येथे काम करतो.

पीडित तरुण व त्याचा मित्र त्यांच्याकडे पँट अल्टर करण्यासाठी दुकानात गेले . तिथे त्यांनी पॅन्ट अल्टर करून घेतली. त्यानंतर पीडित ग्राहक व आरोपी यांच्यात पैसे देण्यावरून वाद निर्माण झाला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली.

यामध्ये चिडलेल्या आरोपीने पीडित तरुणाला स्टूल फेकून मारला व रागाने कात्री त्याच्या पोटात खुपसली अशी तक्रार पीडित तरुणाने दिली आहे. या घटनेचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Share This News

Related Post

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं ! ‘त्या’ एका संशयामुळे काकाकडून पुतणीची हत्या

Posted by - October 19, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत…
Nashik News

Nashik News : पत्नी अन् 13 महिन्यांच्या मुलाला वाऱ्यावर सोडत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 5, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या संसार अर्ध्यावर सोडून एका तरुणाने…
Aniket Pote

Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड

Posted by - December 19, 2023 0
भुवनेश्वर : मुंबई खिलाडी संघाने अल्टीमेट खो-खो सीझन 2 साठी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे (Aniket Pote) याच्या नावाची घोषणा केली…

#WHATSAAP : स्टेटसमध्ये व्हिडिओ किंवा फोटो ऐवजी ठेवा स्वतःच्या आवाजात व्हॉइस नोट; आजच WHATSAAP अपडेट करा

Posted by - February 6, 2023 0
#WHATSAAP : आपल्या ग्राहकांना नेहमी चांगला अनुभव देण्यासाठी व्हाट्सअप मध्ये नवनवीन पिक्चर्स ऍड केले जात असतात आतापर्यंत आपण व्हाट्सअप स्टेटसमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *