Ahmadnagar News

Ahmadnagar News : धक्कादायक! अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक

951 0

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील (Ahmadnagar News) खरे कर्जुले गावामधून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ज्यामध्ये 12 बॉम्ब, 25 किलो दारूगोळा आणि 25 पिस्तूल राउंडचा समावेश आहे. या शस्त्रसाठ्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांकडून त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे.

Irshalwadi Landslide : राज्यातल्या दरडप्रवण क्षेत्रातल्या नागरिकांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

लष्कराचे प्रशिक्षण केंद्र
अहमदनगरमध्ये भारतीय लष्कराचे के. रेंज हे रणगाड्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षणादरम्यान टाकीतून उडवलेले बॉम्ब ज्याचा स्फोट झालेला नाही, असे बॉम्ब पुन्हा एकदा जवानांकडून गोळा केले जातात. मात्र या फायर रेंजचे क्षेत्रफळ खूप मोठे आहे. जंगल क्षेत्र असल्याने तेथे लष्कराचे लोक पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे गावातील काही लोक असे बॉम्ब गोळा करतात आणि त्यानंतर ते फोडून भंगारात विकतात.

Rich MLA : देशातील श्रीमंत आमदारांची यादी जाहीर; डी. के शिवकुमार ठरले सर्वात श्रीमंत आमदार

आरोपीला अटक
या गावामध्ये (Ahmadnagar News) एक जणाच्या घरात बॉम्ब आणि दारुगोळा असल्याची छुपी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी गावात जाऊन छापा टाकला असता 25 किलो दारू गोळा, 12 बॉम्ब, 25 पिस्तूल राउंड आढळून आले आहेत. या प्रकरणात स्फोटक साहित्य आणि शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी आरोपी दिनकर शेळके याला अटक करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!