rakhi sawant and brother

Rakhi Sawant Brother Arrested : राखी सावंतच्या भावाला अटक! ‘ते’ प्रकरण आले अंगलट

696 0

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री राखी सावंत हिचा भाऊ राकेश अनंत सावंत (Rakhi Sawant) याला ओशिवरा पोलीसांनी अटक केली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला हि अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
3 वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोर्ट केस क्रमांक 96/ss/2021 कलम 138 अ जामीन पात्र वॉरंट वरती राकेशला ही अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने राकेश सावंत यास पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र राकेश सावंत याने पैसे परत न केल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले. यानंतर ओशिवरा पोलिसांनी राकेश सावंत याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राखी सावंत सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. आता सध्या ती तिच्या भावामुळे चर्चेत आली आहे. आता या प्रकरणी राखी सावंत काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!