Acid Attack

Acid Attack : लग्न मोडल्यामुळे संतप्त होऊन आरोपीचे झोपलेल्या तरुणीसोबत ‘हे’ संतापजनक कृत्य

667 0

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये लग्न मोडल्याने संतप्त झालेल्या तरुणाने एका तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) केला आहे. या हल्ल्यात (Acid Attack) तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Depression : ‘या’ फळांच्या बियांचे सेवन केल्याने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राजकरण शर्मा असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीचे लग्न आरोपी तरुणासोबत निश्चित झाले होते. त्यानंतर काही कारणांनी हे लग्न मोडले. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने रात्री दीड वाजताच्या सुमारास मुलीच्या घरी पोहोचून तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) केला. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी आवाज उठवला आणि तरुणीला रुग्णालयात नेले. इथे तिची गंभीर प्रकृती पाहता वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचारानंतर तिला ट्रॉमा सेंटरला लखनौला रेफर करण्यात आले.

Pune News: नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथीयांचे आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून रात्रीच गावाच्या बाहेरुन आरोपीला अटक केली. आरोपीची सध्या चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती एसएसपी राजकरण नय्यर यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!