Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 1 ठार 3 जण जखमी

1578 0

वाशिम : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) होणारे अपघात काही थांबायचे नाव घेईना. ऐन दिवाळीच्या तोंडावर शनिवारी मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या कारंजा टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
दिवाळीनिमित्त पुण्याहून वर्ध्याला गावी 4 तरुण निघाले होते. समृद्धी महामार्गावरून जात असताना वाशिमच्या कारंजा टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर एक ट्रक उभा होता. नादुरुस्त असल्याने उभा करण्यात आलेला हा ट्रक कार चालकाला दिसला नाही. ट्रक जवळ येताच कार चालकाने दुसऱ्या लेनमधून गाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी कंट्रोल न झाल्याने सुरक्षा कठड्याला कार धडकली. धडकेनंतर कार पलटी होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातात वर्ध्यातील कौस्तुभ मुळे हा तरुण जागीच ठार झाला. तर अंकित गडकरी, कार्तिक निपोडे आणि संदेश गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

eknath shinde

Maharashtra Cabinet Decision : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Posted by - November 29, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. चला…

भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? अग्निपथ योजनेवर मुख्यमंत्र्यांचा सवाल

Posted by - June 19, 2022 0
हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे, भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा…

पुणे पोलीस दलातील ‘त्या’ तीन झिंगाट पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत केले असे कृत्य…

Posted by - November 22, 2022 0
पुणे : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भादवि कलम 323, 504, 506 यासह मुंबई दारूबंदी…
Merath

हिंदू मुलाशी मैत्री केली म्हणून भर बाजारात जमावाचे मुस्लीम मुलींशी गैरवर्तन (Video)

Posted by - May 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) मेरठमधून (Meerut) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्या ठिकाणचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *