Breaking News
Pune News

Pune News : वरंध घाटात खासगी मिनी बसचा भीषण अपघात

2206 0

पुणे : राज्यात अपघाताचे (Pune News) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या वरंध घाटात खासगी मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस 50 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात झाला तेव्हा या बसमध्ये एकूण 13 प्रवासी होते. अपघातामध्ये पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
नीरा-देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात हा अपघात झाला आहे. ही बस दरीत कोसळल्यानंतर तिथे असलेल्या झुडपामध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र तरी देखील अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.अजिंक्य संजय कोलते (राहणार धनकवडी पुणे) या व्यक्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. स्थानिकाच्या मदतीनं यातील जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये राजेंद्र लाला मिसाळ, रमेश तुकाराम महाडिक, करिष्मा उत्तम कांबळे आणि सुभाष कदम हे जखमी झाले तर अजिंक्य संजय कोलते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!