Accident

Accident : देवदर्शनाहून परत येताना काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

845 0

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताचे (Accident) सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा या महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. सिन्नरच्या आगासखिंड गावाजवळ हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डीहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला आहे. जखमी व्यक्ती हे शिर्डीला दर्शनासाठी आले होते.

काय घडले नेमके?
कारवरील नियंत्रण सुटल्याने समृद्धी महामार्गावर असलेल्या कठड्याला धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातातील जखमींना घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

Electric Shock : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

याआधी 20 तारखेलाही समृद्धी महामार्गावर ट्रकचा असाच अपघात (Accident) झाला होता, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. कारंजा ते दोनद दरम्यान भरधाव ट्रक पुलावरून खाली कोसळला, त्यानंतर ट्रकने पेट घेतला. नाशिकहून कांदे भरून हा ट्रक कोलकात्याच्या दिशेने चालला होता. तेव्हा रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला, ज्यामध्ये ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराचा होरपळून मृत्यू झाला होता.

Share This News
error: Content is protected !!