कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

137 0

मुंबई, दि. ०४ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दि.१४ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Share This News

Related Post

ब्रेकिंग न्यूज, उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचे निधन

Posted by - February 12, 2022 0
पुणे- प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे. बजाज हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने…

अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ’ गणपती ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

Posted by - April 22, 2023 0
पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या…

महापालिका निवडणुकांचा फैसला पुन्हा लांबणीवर; 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Posted by - November 11, 2022 0
पुणे : राज्यातील महापालिकांच्या लांबलेल्या निवडणुका नक्की कधी होणार यासंदर्भातला फैसला पुन्हा लांबणीवर पडला असून सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील याचिकेवर…

हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड (व्हिडिओ)

Posted by - April 7, 2022 0
पुणे- शहरातील धनकवडी भागांमध्ये कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर मधून धिंड काढली. या गुंडांमुळे…
Maharashtra Weather Update

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Posted by - April 21, 2024 0
पुणे : भारतीय हवामान विभागाने (Weather Update) पुणे आणि महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ येण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *