भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish wagh) यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फुरसुंगी फाटा परिसरात असलेल्या ब्लूबेरी हॉटेलच्या समोरून सकाळी साडेसहाच्या सुमारास सतीश वाघ यांचं अपहरण झालं. ही घटना त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने पाहिली. सातच्या सुमारास वाघ यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. साडेसात वाजता हडपसर पोलिसांना कळविण्यात आलं. साडेआठ वाजता गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. साडेनऊ वाजता पोलिसांची 12 पथक प्रत्यक्ष तपासासाठी रवाना झाली. बारा वाजल्यापासून सीसीटीव्ही आणि फोनच्या लोकेशन वरून तपास सुरू केला गेला. तीन वाजता पुण्याचा आयुक्तांनी स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण तपासाचा आढावा घेतला. आणि तपास सुरू असतानाच साडेपाच ते सहाच्या दरम्यान शिंदवणे घाटात वाघ यांचा मृतदेह सापडला.
शिंदवणे घाटाच्या परिसरात काही मुलं फिरत असताना त्यांना हा बेवारस मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आठ वाजता घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड पोहोचले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला. व पोलिसांच्या पथकांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला.
SATISH WAGH MURDER:योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्येचं गूढ वाढलं
Bullet Fire Video : धावत्या बुलेटला लागलेली आग विझवताना अचानक झाला स्फोट