सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पुणे पोलिसांनी दोन संशयितांना घेतलं ताब्यात

MLA YOGESH TILEKAR’S UNCLE SATISH WAGH MURDER: सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पुणे पोलिसांनी दोन संशयितांना घेतलं ताब्यात

401 0

योगेश टिळेकर (YOGESH TILEKAR) यांचे मामा सतीश वाघ (SATISH WAGH) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश वाघ हत्या प्रकरणात दोन संशयितांना (TWO SUSPECTS) पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील वाघोली परिसरातून दोन संशयितांना क्राइम ब्रांचच्या युनिट 5 ने अटक केली आहे‌.

कोण आहेत संशयीत ?

पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी या दोन संशयितांची नावं आहेत. या दोघांनाही क्राईम ब्रांचने वाघोली परिसरातून सायंकाळी अटक केली. त्यानंतर या दोघांनाही पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात असलेल्या क्राईम ब्रँचच्या विभागात आणण्यात आलं. त्यानंतर या दोघांची कसून चौकशी चालू आहे. या प्रकरणात आणखी चार आरोपींचा सहभाग असल्याने या आरोपींचा शोध सुरू आहे.

खूनाचं कारण काय?

सतीश वाघ यांची लोणी काळभोर परिसरात एक एकर शेत जमीन आहे. या जमिनी बाबतचा एक खटला दिवाणी न्यायालयात चालू आहे. त्याचबरोबर त्यांनी एका व्यक्तीला तीस-पस्तीस लाख रुपये दिले होते. जे परत मिळवण्यासाठी सतीश वाघ हे समोरच्या व्यक्तीला सातत्याने फोन करत होते, अशी माहिती सतीश वाघ यांचे चिरंजीव ओंकार वाघ यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणातूनच त्यांची हत्या झाली आहे का, या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Share This News
error: Content is protected !!