नागपूर मध्ये झालेल्या हिट अँड रन अपघातामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकळे यांनी अपघातापूर्वी बीफ कटलेट मागवले असल्याची धक्कादायक माहिती ठाकरे गटाच्या उपनेते आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
अपघात झालेल्या ठिकाणी आज सुषमा अंधारे यांनी भेट दिली याबरोबरच पोलीस स्टेशनमध्ये देखील सुषमा अंधारे यांनी भेट दिल्याचे पाहायला मिळालं.
अपघात कसा झाला?
एका हॉटेलमध्ये हे सर्वजण जेवण करायला गेले होते. तिथून घरी निघताना अपघात झाला. हॉटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाता वेळी गाडीचा वेग नेमका किती होता याची तपासणी करण्यासाठी ऑडी शोरूम मधून टेक्निशियनला बोलावून त्याच्या मदतीने तपास केला जाईल. संकेत बावनकुळे यांना सोडून इतर दोघांनीही म्हणजेच अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार यांनी मद्यप्राशन केले होते. संकेत बावनकुळे यांचा मद्य प्रशान रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.’, अशी माहिती त्यांनी दिली.