राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत.
अनेक जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या संघर्ष पाहायला मिळत असून महायुतीच्या जागांवर संघर्ष आहे त्यापैकी एक जागा असणाऱ्या पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात अजित पवारांचे विश्वासू आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी फेसबुक सूचक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
उगवत्या सूर्याला ही नमस्कार करावा अन् मावळत्या सुद्धा कारण मावळतीला झुकलेल्या सूर्याकडे सेवा पूर्तीचं तेज असतं अन उगवतीच्या सूर्याकडे उद्याचं स्वप्न असतं. त्यामुळे सूर्योदय अन सूर्यास्त दोन्हीला ही वेगळं सौंदर्य असतं.! असं दिगंबर दुर्गाडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे संजय जगताप हे विद्यमान आमदार असून काँग्रेसकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर महायुतीकडून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे शिवसेनेकडून इच्छुक आहेत तर भाजपाकडून माजी आमदार अशोक टेकवडे पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख वापराचे जाधवराव भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे इच्छुक आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिगंबर दुर्गाडे हे इच्छुक आहेत. 2014 मध्ये दिगंबर दुर्गाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.