शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक (व्हिडिओ)

303 0

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. खोडवेकर यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. प्रशासकीय सेवेतील मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांनी सुशील खोडवेकर यांना अटक केल्याची माहिती दिली आहे. आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे उपसचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहेत. यापूर्वी पुणे सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व प्रितीश देशमुख यांना अटक केली आहे.

सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून पुणे सायबर पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज (शनिवार) दुपारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!