SANTOSH DESHMUKH CASE| या’ आरोपीची सुटका होणार; नेमकं कारण काय?

474 0

संतोष देशमुख (SANTOSH DESHMUKH)हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींनी विरोधात न्यायालयात चौदाशे पानांचा आरोपपत्र दाखल केल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकीत असलेल्या एका आरोपीची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत नेमका हा आरोपी कोण आहे? आणि त्याची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने का दिले पाहुयात.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आपला तपास पूर्ण करून केजच्या न्यायालयात 1400 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे, तो सुद्धा मांडण्यात आला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली ? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे.दरम्यान, संतोष देशमुख यांना मारहाण करताने जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं ते सीआयडीच्या हाती लागलं. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपी दिसतायत, ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचलं. हत्येमागच हेच कारण असल्याच सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
या आरोपपत्रात सीआयडीने प्राप्त पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे म्हटले आहे.संतोष देशमुख यांच्या अपहरणापूर्वी सिद्धार्थ सोनवणे यांनीच टीप दिली होता, अशा आरोपाखाली सीआयडीने 70 दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र आता केजच्या न्यायालयाने सोनवणे यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात यावे, असा आदेश दिला आहे. सध्या सिद्धार्थ सोनवणे हे बीड जिल्हा कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्यांची सुटका होणार आहे.

संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवान गडावर; नामदेव शास्त्रीने दिले कुटुंबीयांना ‘हे’ आश्वासन

Open Letter To CM:मी…संतोष देशमुख बोलतोय! Santosh Deshmukh यांचं मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र!

UJWAL NIKAM| संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती

BREAKING NEWS| संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

SANTOSH DESHMUKH ON VALMIK KARAD: वाल्मीक कराडला तुरुंगात भेटणारी व्यक्ती कोण?

WHO IS BASAVRAJ TELI: संतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमलेल्या SIT चे प्रमुख बसवराज तेली आहेत कोण?

Share This News
error: Content is protected !!