Water Supply

Pune Water Supply : पुणेकरांना दिलासा ! पुणे शहरातील पाणी कपात रद्द

768 0

पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पुणे शहरातील पाणी कपात रद्द (Pune Water Supply) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पूर्णवेळ पाणी (Pune Water Supply)  मिळणार आहे. बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!