उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले

426 0

राज्यातील अनेक भागांत उन्हाळी कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशि, पुणे, सोलापूर, सांगली इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.

महिनाभरापूर्वी दिवासाला वाढणारे दर आता एका रात्रीतून कसे घसरतात हे कांदा बाजारपेठेत बघायला मिळाले आहे. महिन्याभरापूर्वी 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेला कांदा आता थेट हजाराच्या आतमध्ये आला आहे.बुधावारी लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात 425 रुपयांची प्रति क्विंटल मागे घसरण झाली आहे.

 

उन्हाळी कांदा बाजारात दाखल होतोय मात्र कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कांद्यासाठी लागलेला उत्पादन खर्च कांदा पिकातून निघेल का असा शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे.

Share This News
error: Content is protected !!