बॉलिवूडमधील बाजीराव आणि मस्तानीची जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.
नुकतंच रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने रणवीरला तुला दीपिकाने बनवलेलं जेवण आवडतं का? असा प्रश्न विचारला.
“मी तिच्या जेवणाचा खूप मोठा चाहता आहे. मला ती जे काही बनवते ते प्रचंड आवडते. ती एक अप्रतिम कुक आहे. तसेच ती मल्टी टॅलेंटेड आहे” असं रणवीरने म्हटलं आहे.
“तू ब्राऊन पॉईंट्स मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे का?” असं दीपिकाने म्हटलं आहे.