वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची आनंददायी बातमी समोर आली असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात.
गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे वाहनांच्या इंधनावरील पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाली आहे. यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे 2 ते 3 रुपयांनी कमी करण्यास वाव मिळाला असल्याचं रेटिंग एजन्सी इक्राने दिली आहे. इक्राने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 74 रुपये प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या आहेत. या किमती मार्चमध्ये 83 – 84 डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या. जर कच्च्या तेलाच्या किमती कमी राहिल्या तर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 ते 3 रुपयांनी कमी करू शकतात.