मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून आता अवघ्या 99 रुपयात कोणतीही तारू मिळणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू सरकारने हा निर्णय घेतला असून यामधून 5500 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते असा दावा करण्यात आलाय.
आंध्र प्रदेश सरकारनं दारुच्या बाबतीत नवीन धोरण जाहीर केलं आहे. या माध्यमातून सरकार कोणताही दारु फक्त 99 रुपयांना मिळणार आहे. 12 ऑक्टोबर पासून हे नव मद्य धोरण लागू होणार असून 3736 नवी दारूची दुकानं उघडण्यात येणार आहेत.