राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असतानाच नुकतंच भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवावी असं आव्हान दिलं होतं.
यावर आता महाविकास आघाडीमध्ये मोठी घडामोडी घडली असून महाविकास आघाडीमधील एका नेत्याने उद्धव ठाकरे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवावं अशी मागणी केली आहे.
जावेद जकारिया यांनी अशी मागणी करणारे पत्रच महाविकास आघाडीला लिहीले आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांना रितसर पत्र लिहून ही मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे अकोला पश्चिम मतदारसंघातून उभे राहिले तर अकोल्यातील मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास जावेद जकारिया यांनी व्यक्त केला आहे. दंगलीचा इतिहास असलेल्या अकोला शहरात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीने जातीय सलोखा निर्माण होईल असेही त्यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे.