माझा राजकीय दौरा नाही फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय- अमित ठाकरे

401 0

राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जातेय.

राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे स्वत: आज शिवजयंती निमित्त शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व महाअभिषेक घातला.

यावेळी अमित ठाकरे यांच्या बरोबर मनसेचे आमदार राजू पाटील, राजेंद्र बाबू वासगावकर, व मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी आम्ही ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला अमित ठाकरे म्हणाले, की.हा माझा राजकीय दौरा नाही. फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय. सगळ्यात शिवभक्तांनी शिवजयंती साजरी करावी असे अमित ठाकरे म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!