राज्य शासनाच्या वतीने सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू असून या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. जोरदार चर्चा पहायला मिळत असून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळतानाही पाहायला मिळतोय.
मात्र अशातच आता छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चक्क पुरुषांनीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज असल्याचं उघडकीस आलंय.
महिलांचे फोटो वापरून एक दोन नव्हे तर चक्क बारा पुरुषांनी हे अर्ज भरल्याचे उघडकीस आलं असून आता महिला व बालविकास विभागाकडून संबंधित पुरुषांवर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय