पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची चौकशी करा… विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

458 0

*पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची चौकशी करा… विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी*

मुंबई:विधानपरिषदेचे विऱोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुण्यातील पोर्श अपघाताचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतं
पुण्यातील पोलीस प्रशासन काय काम करतं असा सवाल राज्य सरकारला विचारला.

या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमितेश कुमार यांची पाठराखण केली असून फडणवीस यांनी अंबादास दानवे यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा बचाव करताना पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी चांगले काम केलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी कोणाचे ऐकून पुणे पोलिस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करु नये, असे फडणवीस यावेळी बोलले.

पोर्श अपघातप्रकरणाची जर टाईमलाईन समजून घेतली अपघात प्रकरणात 8 वाजून 13 मिनिटांनी एफआयआर नोंदवण्यात आला. 10 वाजून 30 मिनिटांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कलम 304 लावण्याचे आदेश दिले. हे प्रकरण न्यायालयासमोर आले तेव्हा पोलिसांनी मागणी केली की, आरोपीला सज्ञान म्हणून पाहा. बालहक्क न्यायालयाने निबंध लिहण्याचे निर्देश दिले होते. त्यावरही पोलिसांनी हरकत घेतली. त्यानुसार कोर्टात याचिका केली. यानंतर आरोपीची रवानगी कोठडीत झाली. या प्रकरणात मला कोणालाही क्लिन चीट द्यायची नाही. ⁠पण पुणे पोलिसांनी चांगली कारवाई केली. ⁠एका पीआयवर कारवाई केली कारण त्या मुलाची मेडिकल आधी करायची होती. पुणे पोलिसांनी रक्ताचे नमुण्या नुसार DNA प्रोफाईलिंग एका मिनिटात कळाले की ते रक्त त्या आरोपी मुलाचे नव्हते. डॉ. तावरे यांचे WhatsApp ट्रॅक केले आणि सर्वांवर कारवाई केली. ती गाडी रजिस्टर नव्हती म्हणून त्यासंबंधी कारवाई करण्यात आली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे सक्तीचा रजेवर नव्हते. तर त्यांचा विक ॲाफ होता. या प्रकरणी 3 डॉक्टरसहित अनेकांवर कारवाई केलीये. ससूनच्या संदर्भात अनेक घोटाळे समोर आले. ससून हॉस्पिटलचे ओव्हर ॲाल रिव्ह्यू ॲाडिट करणार असल्यास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जामिनाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात : देवेंद्र फडणवीस

पुणे कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणात राज्य सरकार आरोपींच्या जामीन विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे. 1-2 दिवसांत तारीख मिळण्याची शक्यता आहे.पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर नियमावली कडक केलेली आहे. पब्जमध्ये जाणारा व्यक्ती 18 वर्षे पूर्ण केलेला आहे का, हे तपासूनच सोडण्यात येईल. यासोबतच पब्जमध्ये देण्यात येणाऱ्या बाबी या अल्पवयीन व्यक्तीला दिल्या जात नाहीत,याची देखरेख सीसीटीव्हीच्या द्वारे ठेवली जाणार आहे. हॉटेल व्यवसायिकांना तो डेटा पोलीस कधीही डेटा मागू शकतात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!