वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आईची एन्ट्री; सगळ्यांना आत टाकण्याची धमकी देत माध्यमांच्या कॅमेऱ्यावर केला हल्ला

341 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आज पूजा यांच्या आईची एन्ट्री झाली. त्यांच्या आईने पोलिसांशी हुज्जत घालत माध्यमांच्या प्रतिनिधींशी ही आरेरावी केली. त्याचबरोबर खाजगी वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्याचं नुकसान करण्याचा प्रयत्नही केला.

पूजा खेडकर यांनी आपल्या खाजगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती. तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता. याच प्रकरणामुळे पूजा खेडकर या चर्चेत आल्या. त्यामुळे त्यांच्या या गाडीवर पोलिसांनी 21 हजारांचा दंड ठोठावला. त्यामुळे याच गाडीवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस हे पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या खेडकर यांच्या बंगल्या बाहेर पोहोचले. त्यावेळी पोलिसांना पाहताच खेडकर कुटुंबीयांनी मुख्य गेट बंद केले. व पोलिसांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलीस काही वेळासाठी निघून गेले. मात्र थोड्याच वेळात ते पुन्हा आले. मात्र त्यांना प्रत्यक्ष गाडीवर कारवाई करता आली नाही. याच सगळ्या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी विविध माध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचवेळी पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर बाहेर आल्या. व माध्यमांच्या प्रतिनिधींवर दमदाटी केली. ‘सगळ्यांनी बाजूला व्हा, नाहीतर सगळ्यांना आत टाकेल’, अशी धमकी देत त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यावर केसांना लावायच्या क्लचने हल्ला केला. कॅमेऱ्याच्या लेन्स वर त्यांनी क्लच मारला. त्यामुळे संपूर्ण खेडकर कुटुंबच आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्याचबरोबर मुलगी एक पट तर आई दहापट अशा चर्चा होत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!