विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू असताना आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून बुलढाणा विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली आहे तर विधिमंडळ गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही निवड केली आहे.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 ते 2019 या काळात बुलढाणा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केल आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. काँग्रेसच्या अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात ते सक्रिय राहिले आहेत. गांधी घराण्याचे ते विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात….पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे..उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आदिवासीसाठी त्यांनी जिवनोत्थान कार्यक्रम राबवला. त्यानंतर ते आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. हर्षवर्धन सपकाळ हे अभ्यासू आणि उच्चशिक्षित आहेत.बुलढाणा जिल्हा परिषदेचे ते माजी अध्यक्ष राहिले आहेत.अध्यक्ष असताना त्यांनी राबवलेल्या शिक्षण मॉडेलची सर्वत्र चर्चा झाली होती…हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी पट्ट्यात मोठ काम केल आहे. राज्यातलं काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं. कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लिन इमेज आहे. ग्रामीण भागात काम, हार्डकोअर कार्यकर्ता आणि पक्षाशी निष्ठावंत अशी ही त्यांची ओळख आहे. त्यांना भाजपकडूनही ऑफर आल्या होत्या मात्र ते काँग्रेसच्या विचारसरणीवर ठाम राहिले…