पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठातील सरस्वती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कुलगुरू प्रा.डॉ सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पराग काळकर यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्रा. डॉ. धोंडीराम पवार,अधिसभा सदस्य प्रसेंजित फडणवीस, सिद्धिविनायक महाविद्यालयाचे प्रा. सुभाष पवार, गरवारे महाविद्यालयाचे प्रा. नितिन आडे आदी मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. धोंडीराम पवार यांनी संत सेवालाल महाराज यांचा समतावादी, सुधारणावादी, वैज्ञानिक दृष्टीकोन त्यांच्या चरित्रातून उपस्थितांसमोर मांडला. तसेच त्यांनी त्यावेळी सांगितलेले त्यांचे दूरदर्शी विचार आधुनिक काळात किती सत्य ठरले याचाही उलगडा यावेळी केला. कुलगुरू डॉ. गोसावी यांनी यावेळी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.