कोल्हापूर- केमिकलचा स्फोट झाल्यानं कोल्हापुरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोटच्या लोट पसरले आहेत.