ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्त्या ; दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन

386 0

देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. प्राथमिक फेऱ्यांचे कल पाहाता भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

गोव्यात देखील भाजपानं दमदार वाटचाल केली असताना काँग्रेससाठी मात्र प्रत्येक फेरीनंतर हा पेपर कठीण होत चालला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे गोवा आणि उत्तर प्रदेशात देखील काँग्रेस पिछाडीवर असताना दिल्लीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचा निषेध करण्यात येत आहे.

 

दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पक्ष मुख्यालयाच्या बाहेर काही कार्यकर्त्यांनी ईव्हीएमचा निषेध करणारे फलक हाती घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल प्रियंका गांधी सेना असं या फलकांवर लिहिलेलं असून त्याखाली इव्हीएमचा निषेध करणारा संदेश लिहिला आहे.

“ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्या होत आहे”, असं या फलकांवर लिहिलेलं आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेसची पीछेहाट होत असताना दुसरीकडे पक्षानं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.

Share This News

Related Post

Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार मर्डर केसचं गूढ वाढलं.., तिचा मित्रही गायब?

Posted by - June 19, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…

सांगलीत संभाजी भिडे यांचा अपघात; सायकलवरून पडल्यानं गंभीर जखमी

Posted by - April 27, 2022 0
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे  यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत. सायकल चालवत…

Excise and Service Tax Appellate Tribunal : रेस्टॉरंट्सद्वारे विकल्या जाणाऱ्या पार्सल खाद्यपदार्थांवर सेवा कर आकारला जाऊ शकत नाही; वाचा हे नियम

Posted by - February 18, 2023 0
कस्टम्स, एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स अपीलल ट्रिब्युनलने (सीईएसटीएटी) नुकतेच म्हटले आहे की रेस्टॉरंट्सद्वारे विकल्या जाणाऱ्या टेक-अवे / पार्सल खाद्यपदार्थांवर सेवा…

फेसबुक आता हे उपयुक्त फिचर करणार बंद, जाणून घ्या

Posted by - May 16, 2022 0
नवी दिल्ली- भारतामध्ये फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आता लवकरच फेसबुकचे अनेक अनोखे आणि उपयुक्त फिचर्स बंद होणार आहेत. कोणते…

महत्वाची बातमी ! शरद पवार यांना UPA अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

Posted by - March 29, 2022 0
नवी दिल्ली- दिल्ली येथे राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *