डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येचे गूढ उकलले; पतीनेच केला खून

731 0

नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणाचे गूढ अखेर उलगडले आहे. पोलिसांना कारमध्ये जळालेल्या हाडांचा ‘डीएनए’ अहवाल मिळालेला असून, ही हाडे डॉ. सुवर्णा वाजे यांचीच असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांना एकूण सहा जणांनी मिळवून संपवले. या संपूर्ण प्रकरणामागचा सूत्रधार हा डॉ. वाजे यांचा पती संदीप वाजे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मात्र, संदीपने अतिशय थंड डोक्याने नियोजनबद्ध पद्धतीने डॉ. वाजे यांना संपवले असल्याचे समोर आले आहे.

कशी घडली घटना ?

डॉ. सुवर्णा वाजे-जाधव या बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. 25 जानेवारी रोजी, मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे सुद्धा त्यांची असल्याची समजले. वाडीवऱ्हे पोलिसांनी याबाबत चौकशी केली. ‘डीएनए’ अहवालातही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही महत्त्वाची माहिती दिली. या तपासात पोलिसांनी अखेर मुख्य आरोपी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपला बेड्या ठोकल्या आहेत.

डॉ. सुवर्णा वाजे कोण होत्या ?

डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोरोना काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही ताण नव्हता. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचे समोर आले आहे. त्यावरून पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकण्यात आल्या.

डॉ. सुवर्णा वाजे यांना पती संदीप वाजे याने का जाळले ?

डॉ. सुवर्णा वाजे आणि पती संदीप वाजे यांचे पटत नव्हते. त्यामुळेच संदीपने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांच्यात वारंवार कौटुंबिक कलह सुरू होता. पती आणि पत्नींमध्ये नेहमी खटके उडायचे. दोघांमध्ये नेहमीच विकोपाला जाणारे वाद विवाद व्हायचे. या कारणामुळेच पती संदीपने पत्नी डॉ. सुवर्णा वाजेंचा खून करायचा प्लॅन आखला आणि इतर पाच जणांना सोबत घेत त्यांनी त्याला संपवल्याचे समोर आले आहे.

Share This News
error: Content is protected !!