मुंबई: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना पंधरा दिवसांचा तुरुंगवास व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
माजगाव कोर्टाने हा निर्णय दिला असून भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यावर माजगाव कोर्टाने हा निर्णय दिलाय.
नेमकं प्रकरण काय?
मुलुंडमध्ये उभारण्यात येणाऱ्या 154 शौचालयांमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा सोमय्या यांनी केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता या आरोपांमध्ये कोणतही तथ्य नसून हा धादांत खोटारडा आरोप आहे असं म्हणत किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
कोण आहेत मेधा किरीट सोमय्या?
या प्रकरणी मेधा सोमय्या यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भारतीय दंड विधान कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. मेधा सोमय्या या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत.