एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे पुणे शहरात मागच्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पुणे दौरा रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचा पाहायला मिळतंय.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो भुयारी मार्गाचा लोकार्पण होणार होतं त्याबरोबर स्वारगेट ते कात्रज या नव्या प्रस्तावित मेट्रो मार्गाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते.
याबरोबरच सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. मात्र पुणे शहराला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.