Helicopter crashed

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, पायलट गंभीर जखमी

423 0

जम्मू काश्मीर : आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील किश्तवारजवळ भारतीय लष्कराचे एएलएच ध्रुव हे हेलिकॉप्टर पाण्यात कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरमधील पायलट जखमी झाले आहेत. ते सध्या ठीक असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या अपघातात हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. लष्कराच्या कोसळलेल्या धुव्र या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय सैन्य दलातील तीन अधिकारी होते. त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे मात्र अद्याप त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.

काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचा असाच एक भीषण अपघात झाला होता. हे हेलिकॉप्टर नियमित उड्डाण करत असताना मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळलं होते. यानंतर तातडीने शोधकार्य सुरु करत हेलिकॉप्टरमधील तीन कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले होते.

Share This News
error: Content is protected !!