ऐतिहासिक निकाल ! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 38 जणांना फाशीची शिक्षा

229 0

अहमदाबाद- अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका तासात 21 बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी 49 पैकी 38 दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर 28 जणांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायामूर्ती अंबालाल पटेल यांनी 6,752 पानी निकालपत्रं तयार केलं. या स्फोट प्रकरणात एकूण 78 आरोपी होते. त्यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार बनला होता. त्यामुळे 77 आरोपी उरले होते. या प्रकरणी तब्बल 1163 लोकांची साक्ष नोंदवण्यात आली होती. पोलीस आणि तपास यंत्रणांनी 6 हजार पुरावे कोर्टात सादर केले होते. दोषींना भादंवि कलमाच्या 302 (हत्या करणे) आणि यूएपीएअंतर्गतही त्यांनी दोषी ठरवण्यात आलं आहे.

कोर्टाने या बॉम्बस्फोटप्रकरणी 28 जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. एकाचवेळी 49 आरोपींना दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोषींना भादंवि कलमाच्या 302 (हत्या करणे) आणि यूएपीएअंतर्गतही त्यांनी दोषी ठरवण्यात आलं आहे.

13 वर्षापूर्वी झाले होते बॉम्बस्फोट

26 जुलै 2008 मध्ये अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटाने हे स्फोट झाले. हे स्फोट मणिनगरमध्ये झालै होते. अतिरेक्यांनी टिफीनमध्ये बॉम्ब ठेवून ते सायकलवर ठेवले होते. त्यानंतर या सायकल गर्दीच्या ठिकाणी नेऊन ठेवल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा मतदारसंघ होता. त्यानंतर 70 मिनिटात 20 स्फोट झाले. या स्फोटात 56 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीनने 2002 मधील गोध्राकांडाचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवून आणले होते.

Share This News

Related Post

दीड महिन्यात 1 कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

Posted by - March 20, 2022 0
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन…

रक्तरंजित फोटो, मृतदेह, त्रासदायक व्हिडिओ टीव्ही चॅनल्सने दाखवू नये; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची प्रसार माध्यमांना सत्ता ताकीद

Posted by - January 9, 2023 0
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारमाध्यमांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये मृतदेहाचे फोटो रक्ताने माखलेले फोटो किंवा कोणतेही…

#GOVERNER : रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल ; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

Posted by - February 18, 2023 0
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली.…

अण्णा हजारे यांना जीवे मारणार ! कुटुंबावर अन्याय झाल्याने शेतकऱ्याचा इशारा

Posted by - April 12, 2023 0
शेतीच्या वादातून अन्याय झाल्याचे कारण देत एका शेतकऱ्याने थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करण्याची धमकी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *