अबब ! जळगावात पारा 44 अंशांवर

168 0

जळगाव जिल्ह्याच्या उष्णतेचा पारा 44 अंश आकडे पोहोचला आहे, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये ,अशा सूचना जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेले आहेत

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णतेची लाट आपण अनुभवत आहोत ,त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यामध्ये अनुभव येत आहे, हवामान खात्याने पूर्व सूचना दिलेले आहेत, त्यामुळे सुचना पत्रकही जारी करण्यात आलेला आहे, या सूचना पत्रकामध्ये नागरिकांना सुचित करण्यात आले आहे ,गरज असेल तरच घराबाहेर पडा, शरीरामध्ये पाण्याची भरपूर प्रमाणात ठेवा, अशा दिलेल्या सूचनांचे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर पालन केलं तर उष्णतेचा धोका होणार नाही, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्र यांनाही याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, उष्माघात आकडे प्रत्येकाने गांभीर्याने बघावं असं जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी म्हटले आहे

Share This News
error: Content is protected !!