पुणे महानगरपालिकेतील एक बडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ; तिघे जण ताब्यात

909 0

पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिकेच्यया कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे याच्यासह तिघांवर 15 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धडक कारवाई केली आहे.

सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई  झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ड्रेनेज व कॉंक्रिटिकरणाच्या कामाचं बील मिळण्यासाठी  सचिन तामखेडे यांना भेटले . त्यांनी 25,000 रूपये लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणी सचिन तामखेडेसह दत्तात्रय किंडरे,अनंत ठोक यांना ताब्यात घेतले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे हे तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!