शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता सातबारा उताऱ्यावर लागणार आईचं नाव

1043 4

सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे.

येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वडिलांचे नाव बंधनकारक नसेल.

तसेच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफारमध्येही आईचे नाव लावण्यात येणार आहे. विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागानं सरकारला पाठविला आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!