BEED COLLECTOR SIGNATURE SCAM: बीडमध्ये चक्क जिल्हाधिकाऱ्यांचीच बनावट स्वाक्षरी

42 0

सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून चक्क जिल्हाधिकाऱ्यांचीच बनावट स्वाक्षरी करून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भूसंपादन लवाद प्रकरणात मागील कालावधीतील तारीख टाकून आदेश निर्गमित करून मोठा आर्थिक अपहार झाल्याचं उघडकीस आले आहे. जवळपास 154 प्रकरणांमध्ये 241 कोटी 62 लाख रुपये वाढीव मोबदल्याचे आदेश काढण्यात आल्याचे उघडकीस आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे

Share This News
error: Content is protected !!