narendra modi

प्रचारासाठी महायुतीकडून महारणनीती! ‘हे’ आठ दिवस ‌पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर

128 0

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. तर काही उमेदवारांनी आपला प्रचार देखील सुरू केला आहे. यातच आता महायुतीने विधानसभेच्या प्रचारासाठी मोठी रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

पंतप्रधान मोदी हे लोकसभेच्या निवडणुकांवेळी देखील प्रचारासाठी आले होते. मात्र यंदा ते तब्बल आठ ते नऊ दिवसांसाठी महाराष्ट्रात येणार असून विविध प्रभागांमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.

मराठवाडा, विदर्भ, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर विभागांमध्ये मोदींच्या विभागनिहाय या सभा पार पडणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान या प्रचार सभा पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठ ते नऊ दिवस महाराष्ट्रात तळ ठोकून बसणार आहेत. त्यामुळे या आठ दिवसात शक्य तितक्या जास्त वेळ आणि वेगवेगळ्या पद्धतीने माहितीचे उमेदवारांचा प्रचार करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीकडून केला जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या सभांचं वेळापत्रक अद्याप समोर आलं नसून लवकरच या दौऱ्याची सविस्तर माहिती प्रसारित केली जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!