प्रशासन लागलं कामाला; आचारसंहितेच्या पहिल्या 24 तासात 14 हजार प्रचार साहित्य हटवली

1072 0

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यात 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या अनुषंगाने शहर प्रशासनाच्या वतीने शासकीय मालमत्तेच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज काढण्यास सुरुवात झाली असून पहिल्या 24 तासात तब्बल 14,542 प्रचार साहित्य हटवण्यात आली आहेत.

याबद्दलची सविस्तर माहिती आचारसंहिता कक्षाच्या समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे. ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर पहिल्या 24 तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने शासकीय इमारती आणि मालमत्तांच्या आवारातील एकूण 14,542 प्रचारसाहित्य तात्काळ हटविण्यात आले आहेत’, अशी माहिती त्यांनी दिली.

किती साहित्य हटवलं ?

जुन्नर विधानसभा मतदासंघात आंबेगाव 1 हजार 430, 1 हजार 169, खेड आळंदी 1 हजार 446, शिरूर 569, दौंड 1 हजार 530, इंदापूर 828, बारामती 890, पुरंदर 1 हजार 966, भोर 155, मावळ 1 हजार 154, चिंचवड 1 हजार 7, पिंपरी (अ.जा.) 38, वडगांव शेरी 158, भोसरी 653, शिवाजीनगर 148, कोथरुड 185, खडकवासला 567, पर्वती 245, हडपसर 238, पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) 91, कसबा पेठ मतदार संघात 75 इतके फ्लेक्स, बॅनर होर्डिंग्ज, भिंतीचित्र, झेंडे हे काढण्यात आले आहेत. यामध्ये भित्तीवरील लिखान 1 हजार 986, भित्तीपत्रके 3 हजार 685, जाहिरात फलके 1 हजार 647, बॅनर्स 2 हजार 795, ध्वज 1 हजार 430 आणि इतर साहित्य 2 हजार 999 यांचा समावेश आहे,

Share This News
error: Content is protected !!