Salman Khan

बुलेटप्रूफ गाड्या, कमांडो, पोलिसांची टीम; सलमान खानच्या सुरक्षेसाठी ‘इतक्या’ कोटींचा खर्च

194 0

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.‌ सलमानला आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलमानच्या याच सुरक्षेसाठी सरकारला दर महिन्याला आणि संपूर्ण वर्षाला एकूण किती खर्च करावा लागणार आहे याबद्दलची माहिती समोर आली आहे.

वाय प्लस सिक्युरिटी म्हणजे काय ?

सलमान खानला वाय प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे म्हणजेच सलमानच्या सुरक्षेसाठी जवळपास 25 सुरक्षा कर्मचारी त्याच्यासोबत असतील. ज्यामध्ये 2 ते 4 NSG कमांडो असतील. त्याबरोबरच दोन ते तीन बुलेटप्रूफ वाहनं देखील सलमान बरोबर असतील. हे 25 सुरक्षा कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वाय प्लस सुरक्षा देणाऱ्या टीम मध्ये नेमके किती लोक असतात, याबाबत स्पष्ट संख्या ही सुरक्षेच्या कारणास्तव सांगितली जात नाही.

सुरक्षेसाठी खर्च किती ?

तज्ज्ञांची दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला वाय प्लस सुरक्षा दिली असेल तर त्या सुरक्षेसाठी दरमहा अंदाजे 12 लाख रुपये खर्च येतो. म्हणजेच वार्षिक खर्च सुमारे 1.5 कोटी रुपयांपर्यंत जातो.

3 कोटींपर्यंत खर्च

सध्या सलमान खानच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. पोलीस प्रशासनाने दिलेली वाय प्लस सुरक्षा आहे. सलमानचे वैयक्तिक बॉडीगार्ड आणि सुरक्षारक्षक आहेत. त्याचबरोबर त्याच्या घराच्या बाहेर सिव्हिल ड्रेस कोड मधले पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. या सर्वांचा वार्षिक खर्च अंदाजे तीन ते साडेतीन कोटी रुपये इतका येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

Share This News
error: Content is protected !!