PRAKASH AMBEDKAR: … तर आज राहुल गांधी पंतप्रधान असते; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

248 0

मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत जाईल असं वाटत असतानाच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे सात लोकसभा मतदारसंघाचे मागणी केली होती मात्र वंचित बहुजन आघाडीची ही मागणी महाविकास आघाडी कडून पूर्ण न झाल्याने वंचित न एकला चलो रे ची भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढवली.

त्यानंतर आता एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठा दावा केला असून आज राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असं म्हटलं आहे.

काँग्रेसने जर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं असतं तर काँग्रेस आणि वंचित न मिळून भाजपाला 220 च्या वर जाऊ दिलं नसतं. भाजपाच्या 20 जागा कमी झाल्या असत्या तर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नसते त्यामुळे वंचितला सोबत घेतलं असतं तर आज देशाला राहुल गांधी पंतप्रधान दिसले असते असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!