Election Commission

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; आता…

165 0

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून केंद्रीय निवडणूक आयोग 26 सप्टेंबर पासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहे या महाराष्ट्र दौरा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक पूर्व आढावा घेतला.

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडले असून या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शपथपत्रात त्यांची वैयक्तिक माहिती, गुन्हे दाखल असल्यास त्याबाबतची माहिती, स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबतची माहिती द्यावी लागते. आता या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुन्ह्यांबाबत वृत्तपत्रातून तीनदा माहिती द्यावी लागणार आहे. त्याबाबत माध्यमांमधून माहिती द्यावी लागणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं

Share This News
error: Content is protected !!