Accident

खंबाटकी घाटातील तीव्र उतारावर ट्रकचा ब्रेक फेल; 7 ते 8 गाड्यांना ट्रकने उडवलं

93 0

सातारा – पुणे महामार्गावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. मार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक वळणावर ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने एकूण सात गाड्यांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला. या अपघातात सहा ते सात जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे संपूर्ण महामार्गावर एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच रविवारी दुपारी सातारा पुणे महामार्गावरील बोगदा ओलांडल्यानंतर तीव्र उतारावरून येत असलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाले. ही गोष्ट चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने समोर असलेल्या गाड्यांना जोरजोरात हॉर्न वाजवून बाजूला सरकण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीव्र उतार असल्यामुळे गाडीचा वेग आपोआप वाढल्याने हा ट्रक पुढे जाऊन सात गाड्यांना धडकला. यामध्ये सात ते आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही वाहनांचं यात नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Share This News
error: Content is protected !!